शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना उपलब्ध करून देण्यासाठी शासनाची ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे.
योजनेची ठळक वैशिष्टे
- सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ १० टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच.
- अनुसूचित जाती - जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के.
- उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान.
- जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ एचपीचे पंप.
- पाच वर्षांची दुरुस्ती हमी, इन्शुरन्स सह.
- वीजबिल नाही, लोडशेडिंगची चिंता नाही आणि सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा.
लाभार्थी निवडीचे निकष
- २.५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ३ अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे सौर कृषीपंप.
- २.५१ ते ५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ५ अश्वशक्ती क्षमतेचा पंप.
- ५ एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्यास ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय राहील. (पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या पंपाची मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील).
- वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहीर, बोअरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुद्धा पात्र.
- शाश्वत पाण्याचा स्त्रोत असल्याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल. (जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी पंप वापरता येणार नाहीत).
- अटल सौर कृषी पंप योजना-१, अटल सौर कृषी पंप योजना-२ व मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले शेतकरी देखील पात्र असतील.
ऑनलाइन अर्ज करा
Apply Now / अर्ज कराही माहिती आवडली का? मित्रांसोबत शेअर करा!